संतपदांची जोड दे रे
संतपदांची जोड दे रे । हरि साधुपदाची जोड ॥१॥
संतसमागमे आत्मसुखाचा । सुंदर उगवे मोड ॥२॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥
अमृत ह्मणे रे हरि भक्ताचा । शेवट करिसी गोड ॥४॥
संतसमागमे आत्मसुखाचा । सुंदर उगवे मोड ॥२॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥
अमृत ह्मणे रे हरि भक्ताचा । शेवट करिसी गोड ॥४॥
| गीत | - | संत अमृतराय महाराज |
| संगीत | - | |
| स्वर | - | |
| गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.