सप्तस्वरांनो लय
सप्तस्वरांनो लयशब्दांनो जगेन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी
तुम्हीच माझे माय-तात हो, तुम्हीच माझे गुरू
अनंत हस्ते अखंड दाते समूर्त कल्पतरू
तुम्हीच माझे सात सूर्य अन् तुम्हीच माझी धरती
प्रकाशदायी सूर्य तुम्ही, तुम्ही बरसते मेघ
तुम्हीच माझ्यामधे पेरिली नवसृजनाची रेघ
तुमच्या स्पर्शे होते काया वीज जणू लवलवती
तुमच्यासंगे भान हरपता कण कण डोलू लागे
एक अनोखा गोफ विणाया आतुर जीवितधागे
देहामधले अणुरेणूही पैंजण होऊन गाती

गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | देवकी पंडित |
चित्रपट | - | राजू |
गीत प्रकार | - | भावगीत |
कल्पतरू | - | कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे. |
सृजन | - | निर्मिती. |