A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सार्थचि ते वदती

सार्थचि ते वदती । लोकीं ।
प्रारब्धाची गति नकळे ती ॥

सारसादि जे बलि भक्षुनियां ।
क्रीडत होते सदनांगणिं या ।
वाढे सांप्रत तृण त्या ठाया ।
पुण्यवली हा कीटक खाती ॥