A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सासर माझं वसलं बाई

सासर माझं वसलं बाई वाहे कृष्णा पलीकडे

देशमुखांचा वाडा मोठा
तयास शोभे सुंदर ओटा
गाई-गुरांनी भरला गोठा
अंगणात ग धवल सुगंधित प्राजक्ताचा सडा पडे

सून लाडकी मी सासूची
प्रेमळ वहिनी भाउजींची
मर्जी मजवर मामंजींची
बाई तिकडच्या संगतीत ग स्वर्गसूखाचा लाभ घडे

भल्या पहाटे ओटीवरती
मामंजी भूपाळी म्हणती
जय जय बोले जय भागिरथी
सडा-संमार्जन करता करता मज भजनाचा छंद जडे