A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सत्पात्र हा ललनाकपोल

सत्पात्र हा ललनाकपोल । अरसिक नर ।
वरि चढवि न नग बहमोल ॥

स्मित चतुर करित परिसुनी सुकाव्या ।
करि वर्णविकारिंच भाव खुला अबोल ॥

करुणहृदय शमवित नरपिपासा ।
वितरोनि सुधोपम चुंबन हर्षलोल ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - वझेबुवा
स्वर- भार्गवराम आचरेकर
नाटक - वधूपरीक्षा
राग / आधार राग - देस
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कपोल - गाल.
परिसा - ऐकणे.
पिपासा - तहान.
लोल - चंचल / आसक्त.
वितरणे - देणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.