सत्यात नाही आले
सत्यात नाही आले, स्वप्नात येउ का?
विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का?
हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाउ का?
हसता नभात तारा, हसता फुलांत वारा
प्राणांत हासते ते उधळून जाउ का?
तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नींच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का?
विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का?
हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाउ का?
हसता नभात तारा, हसता फुलांत वारा
प्राणांत हासते ते उधळून जाउ का?
तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नींच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का?
गीत | - | संजीवनी मराठे |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | मंदाकिनी पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
सान | - | लहान. |