सावळें सुंदर रूप मनोहर
सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आह्मांसी सहज द्यावें आतां ॥३॥
तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥४॥
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आह्मांसी सहज द्यावें आतां ॥३॥
तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥४॥
| गीत | - | संत तुकाराम |
| संगीत | - | श्रीनिवास खळे |
| स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
| राग / आधार राग | - | मालकंस |
| गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
| चाड | - | शरम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












पं. भीमसेन जोशी