शब्दाविना ओठांतले
शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले
माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले
माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला
गीत | - | विजय कुवळेकर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | जयश्री शिवराम, रूपकुमार राठोड |
चित्रपट | - | तू तिथं मी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Print option will come back soon