शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
मी झाले गंगा, झाले घर काशी
बोलता, मज बोलावून घेतो
चुकता मी, रागावून जातो
माय-बापही होऊन येतो
मिठी मारतो कवळून हृदयाशी
पुंडलिकापरी करते सेवा
तव चरणांची अविरत देवा
त्या सेवेचा वाटुनी हेवा
देव भेटतो रोज मजसी
मी झाले गंगा, झाले घर काशी
बोलता, मज बोलावून घेतो
चुकता मी, रागावून जातो
माय-बापही होऊन येतो
मिठी मारतो कवळून हृदयाशी
पुंडलिकापरी करते सेवा
तव चरणांची अविरत देवा
त्या सेवेचा वाटुनी हेवा
देव भेटतो रोज मजसी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | कधी करिशी लग्न माझे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |