शारद सुंदर चंदेरी राती
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐकना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगेसोयरे मी सांडिले पाठी
मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच ना रीती?
कशाला कुणाची भीती?
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना, ये ना? आतुर जीव हा झाला
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे
वार्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जिवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धुंद काया, मोहवाया
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐकना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगेसोयरे मी सांडिले पाठी
मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच ना रीती?
कशाला कुणाची भीती?
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना, ये ना? आतुर जीव हा झाला
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे
वार्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जिवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धुंद काया, मोहवाया
| गीत | - | शान्ता शेळके |
| संगीत | - | हेमंत भोसले |
| स्वर | - | आशा भोसले |
| गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, कल्पनेचा कुंचला, भावगीत |
| कुंद | - | एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा. |
| पावरी | - | बासरी. |
| शारद | - | शरद ऋतू मधली. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले