शेत बघा आलंया राखणीला
शेत बघा आलंया राखणीला
सोन्याचं घुंगरू गोफणीला
लखलख पाचूचा हिरवा वाडा
रोखलाय वार्यानं तेजाचा घोडा
गव्हल्या गाईचा अवखळ पाडा
धन्यानं बांधलाय् दावणीला
मोत्याची नथणी मराठमोळी
लज्जेची लेणी अंगभर ल्याली
सोन्याच्या पाउली लक्षुमी आली
राहिली जन्माची चाकरीला
एकीच्या सुखाला लावता पिडा
पाखरांनो उडा नजरेत दडा
गोफणीत घुमतोय विषारी खडा
नका गणू गुजावणं देखणीला
सोन्याचं घुंगरू गोफणीला
लखलख पाचूचा हिरवा वाडा
रोखलाय वार्यानं तेजाचा घोडा
गव्हल्या गाईचा अवखळ पाडा
धन्यानं बांधलाय् दावणीला
मोत्याची नथणी मराठमोळी
लज्जेची लेणी अंगभर ल्याली
सोन्याच्या पाउली लक्षुमी आली
राहिली जन्माची चाकरीला
एकीच्या सुखाला लावता पिडा
पाखरांनो उडा नजरेत दडा
गोफणीत घुमतोय विषारी खडा
नका गणू गुजावणं देखणीला
| गीत | - | पी. सावळाराम |
| संगीत | - | वसंत प्रभु |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | नांदायला जाते |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| गुजावणं | - | बुजगावणे, पशुपक्ष्यांना भिवविण्यासाठी उभे केलेले बाहुले. |
| गोफण | - | शेतातील धान्यावरील पक्षी उडवण्यासाठी दगड मारताना वापरावयाचे उपकरण. |
| दावण | - | गुरे बांधण्याची लांब दोरी. |
| पाडा | - | गायीचे मूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले