A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शिकवितेस तू शिकता शिकता

शिकवितेस तू शिकता शिकता
सहज मजकडे बघता बघता

बघायलाही तुम्ही शिकविता
सहज मजकडे बघता बघता

तुझी पापणी ती ढळलेली
गूज मनीचे लिहिते गाली

कळते मजला तुम्ही वाचता
सहज मजकडे बघता बघता

स्पर्श सारखा पुसतो काही
हर्ष मनाचा अबोल राही

परि बोलकी तुझी मुग्धता
सहज मजकडे बघता बघता

करिशी वेणी मागेपुढती
निळी पाखरे नयनी उडती

हसता मजला अर्थ लागता
सहज मजकडे बघता बघता

चंपक गोर्‍या रोमांचातुन
गीत सुगंधी येता बहरून

बावरशी का प्रीत गुंजता
सहज मजकडे बघता बघता
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.