शिरशिरणारा गोड गारवा
शिरशिरणारा गोड गारवा, वरून अंबर रिमझिमते
बांधावरती उभे कुणीसे धुक्यात दिसते ओझरते
उगाच झाडे सळसळती
अंग आपुले घुसमळती
नभात दाटे कुंद हवा अन् ढगांत अमृत पाझरते
पदर हालतो अंधुकसा
भास नव्हे हा खास असा
वारा होतो फितुर आणि रान जाईचे घमघमते
प्राण दाटती नेत्रांशी
नेत्रांपुढल्या चित्राशी
धुक्याचा पदर विरतो आणिक भान जगाचे विस्मरते

गीत | - | प्रसाद कुलकर्णी |
संगीत | - | युधामन्यू गद्रे |
स्वर | - | मंदार आपटे |
गीत प्रकार | - | भावगीत |