शोधू नको मना रे
शोधू नको मना रे तू अर्थ जीवनाचा
अज्ञात खेळ चाले हा ऊन-सावल्यांचा
असते इथे निराशा आशेत गुंफलेली
स्वप्ने सजून येती वैफल्य माळलेली
हास्यात साठलासे उद्घोष आसवांचा
बहरातल्या कळीला निर्माल्य शाप देते
बाधा तशी जरेची का यौवनास होते?
उदयासवेच ठरतो आकार शेवटाचा
या आगळ्या कथेचे वेड्या अगम्य सूत्र
त्याच्यात गोवलेले सारेच प्राणिमात्र
हे सूत्र हालवितो हुंकार संचिताचा
अज्ञात खेळ चाले हा ऊन-सावल्यांचा
असते इथे निराशा आशेत गुंफलेली
स्वप्ने सजून येती वैफल्य माळलेली
हास्यात साठलासे उद्घोष आसवांचा
बहरातल्या कळीला निर्माल्य शाप देते
बाधा तशी जरेची का यौवनास होते?
उदयासवेच ठरतो आकार शेवटाचा
या आगळ्या कथेचे वेड्या अगम्य सूत्र
त्याच्यात गोवलेले सारेच प्राणिमात्र
हे सूत्र हालवितो हुंकार संचिताचा
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वराविष्कार | - | ∙ अपर्णा मयेकर ∙ गजानन वाटवे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत |
टीप - • स्वर- अपर्णा मयेकर, संगीत- श्रीनिवास खळे. • स्वर- गजानन वाटवे, संगीत- गजानन वाटवे. |
जरा | - | वृद्धत्व. (अजर- जरारहित, वार्धक्यरहित) |
संचित | - | पूर्वजन्मीचे पापपुण्य. |