श्रावणझड बाहेरी
श्रावणझड बाहेरी
मी अंतरि भिजलेला
मिटून चोच पंखातच
एक पक्षि निजलेला
अभ्रांचा हृदयभार
थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस
चिंब होत ओसरतो
उथळ उथळ पल्वलांत
संगळून जळ बसते
क्षणजीवी वर्तुळांत
हललेसे भासविते
चळते प्रतिबिंब जरा
स्थिर राहून थिजताना
बिंदुगणिक उठलेले
क्षीण वलय विरताना
झिमझिम ही वार्यासह
स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रेतून
शब्दांना जाग नसे
मी अंतरि भिजलेला
मिटून चोच पंखातच
एक पक्षि निजलेला
अभ्रांचा हृदयभार
थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस
चिंब होत ओसरतो
उथळ उथळ पल्वलांत
संगळून जळ बसते
क्षणजीवी वर्तुळांत
हललेसे भासविते
चळते प्रतिबिंब जरा
स्थिर राहून थिजताना
बिंदुगणिक उठलेले
क्षीण वलय विरताना
झिमझिम ही वार्यासह
स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रेतून
शब्दांना जाग नसे
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | हृषिकेश रानडे |
गीत प्रकार | - | कविता, ऋतू बरवा |
पल्वल | - | कुंड, लहान तळे. |
संगळा | - | रास, डीग, गोळा. |