श्रीरामा घनश्यामा बघशिल
श्रीरामा घनश्यामा बघशिल कधी तू रे?
तुझी लवांकुश बाळे
वनवासाच्या घरात माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतिचे दु:खही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले
रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ति
पूर्ण पाहिले तुला राघवा परि ही दैवगती
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले?
बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा पडु दे श्यामलकंठी
ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठी
मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
तुझी लवांकुश बाळे
वनवासाच्या घरात माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतिचे दु:खही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले
रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ति
पूर्ण पाहिले तुला राघवा परि ही दैवगती
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले?
बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा पडु दे श्यामलकंठी
ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठी
मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | मिश्र रागेश्री |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |