A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीरामा घनश्यामा आलास

श्रीरामा, घनश्यामा
आलास कधी परतून ?
वनवासाच्या हालअपेष्टा
धीराने सोसून

सती जानकी वनीं एकली
बसली होती डोळे लावुनि
हाक सतीची ऐकून कानी
उठविलेस कानन

लंकेवरती स्वारी करुनी
तुवा दंडिला राक्षस रावण
भूमीवरचे पाप गाडिले
लंकेला उखणून

बंधुप्रेम भरताचे सोज्वल
कीर्ति गाजली जगात उज्ज्वल
तुझ्या पदीच्या पूज्य पादुका
सिंहासनी स्थापून
कानन - अरण्य, जंगल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.