A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवाचिये द्वारीं उभा

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥

हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - श्रीधर फडके
स्वराविष्कार- सुरेश वाडकर
प्रसाद सावकार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - गीता गाती ज्ञानेश्वर
गीत प्रकार - संतवाणी, नाट्यसंगीत
  
टीप -
• स्वर- सुरेश वाडकर, संगीत- श्रीधर फडके.
• स्वर- प्रसाद सावकार, संगीत- वसंत देसाई, नाटक- गीता गाती ज्ञानेश्वर.
भावार्थ-

जो रोज क्षणभर तरी देवाच्या द्वारात उभा राहतो तो मोक्षाभिमुख झाला. वाणी हे देवाचे द्वार होऊ शकते. मनुष्याला संसारात वागावे लागत असले तरी वाणीत त्याने संसार भरू नये. वाणी हरि-नामस्मरणाकडेच योजावी. नाम-स्मरण करणार्‍याला भगवान्‌ वश होतो याविषयी व्यासादिकांची साक्ष आहे.

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुरेश वाडकर
  प्रसाद सावकार