श्रीरामाच्या पूजेसाठी आज
फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी, दाही दिशा गाजली
हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली
पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळ-मंजिरी, तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी, दाही दिशा गाजली
हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली
पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळ-मंजिरी, तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पाच नाजूक बोटे |
गीत प्रकार | - | राम निरंजन, चित्रगीत |
नौबत | - | मोठा नगारा. |
मंजिरी | - | एक प्रकारचे घनवाद्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.