श्रीकृष्णा सारंगधरा
          श्रीकृष्णा सारंगधरा । मी लाजुन धरते करा ।
चला नेते माझ्या घरा । उडवा रंग रंग रंग ॥
तुम्ही माझ्या महाली चला । थाट विलासी केला भला ।
तुम्हा पचला तर उचला । सचला नंग नंग नंग ॥
आज महाली लाजुं नका । मनीं वाटेल तेवढं झुका ।
धरा लगाम ओढुनी पक्का । अगदी तंग तंग तंग ॥
म्हणे पठ्ठे बापुराव कवी । अनुभविक नवलाची ओवी ।
भरोशाची आहे काकवी । करूं नये भंग भंग भंग ! ॥

| गीत | - | शाहीर पठ्ठे बापूराव | 
| संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर | 
| स्वर | - | कीर्ती शिलेदार | 
| नाटक | - | स्वरसम्राज्ञी | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 कीर्ती शिलेदार