A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीरंगा कमलाकांता

श्रीरंगा कमलाकांता
हरि पदरातें सोड

ब्रिजवासी नारी
जात असो कीं बाजारीं
कान्हा का मुरारी
अडवितां कां कंदारी
मथुरेची बारीं
पाहुं मजा हो गिरिधारी
विकुन नवनित दधि गोड
हरि पदरातें सोड

ऐका लवलाही
गृहिं गांजिति सासूबाई
परतुनिया पाहीं
येउं आम्ही ईश्वरग्वाही
दान देऊन काही
मग जाऊं आपले ठाईं
पतिभयानें देह रोड
हरि पदरातें सोड

विनवुनी कृष्णासी
शरणागत झाल्या दासी
आणिल्या गोपि महालासी
होनाजीरायासी
जा मुकुंदा सोड रे