A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शुभमंगल या समया

शुभमंगल या समया, फुलल्या आनंदे दशदिशा

जीवनस्वप्‍न मनोहर अपुले, आले अजि उदया
शुभमंगल या समया

नाचती डोलती आनंदे ही देवाची बाळे
भूवरी नंदनवन आले
बघुनि तयांची सौख्यसंपदा
येईल लाजुनी आश्रय घ्याया, पर्णकुटीत कुबेर
कुटिर (कुटी) - झोपडी.
कुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.

 

  ज्योत्‍स्‍ना भोळे, पंडितराव नगरकर