A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शूर आम्ही सरदार आम्हाला

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती !

जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया-ममता-नाती !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.