श्वानाहुनि अति नीच
          श्वानाहुनि अति नीच तुम्ही रे, स्वार्था मांजरसे टपतां ।
जंबुकगुरु जनवंचनकामीं । साधुबकापरि वरि दिसतां ॥
वेदशास्त्रसंपन्न म्हणवितां । केलि मुखोद्गत ती गीता ।
तत्त्व तयांतिल कळे हेंच का । सत्यपराङमुख कां होतां ॥
श्वान नाचतें पुच्छ घोळितें, चाटि अंग तुकड्याकरितां ।
तसें नाचतां आर्जव करितां, रुचे समर्था तें वदतां ॥
तो म्हणे अश्व वृषभाला । तुम्हि मान तुकवितां त्याला ।
तो म्हणे अहो रवि मेला । लावितां पदर डोळ्यांला ।
मी कसा तरुण रंगेला । म्हणतांचि मदन अवतरला ।
नरनंदी हे लक्ष्मीनंदन । त्यांत भोंवतीं तुम्हि जमतां ।
श्वान काक बक ढोंगी सोंगी । दिवटी त्याच्या करि देतां ॥

| गीत | - | गो. ब. देवल | 
| संगीत | - | गो. ब. देवल | 
| स्वर | - | |
| नाटक | - | शारदा | 
| चाल | - | मम गौरीही कूपि न मी | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
| टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. | 
| काक | - | कावळा. | 
| जंबूक | - | कोल्हा. | 
| दिवटी | - | लहान मशाल. | 
| बक | - | बगळा. | 
| वृषभ | - | बैल. | 
| श्वान | - | कुत्रा. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !