श्यामल श्यामल मेघांसम
श्यामल श्यामल मेघांसम का भरून येती लोचन
राधिके येईल ग मोहन
हा नवरंगी साज सुगंधी
करिते गोकुळ बघ आनंदी
भिजवाया या हर्षाला उगाच का वर्षावा सावन
लोचन डोही यमुनेवाणी
जमले काळे काजळपाणी
जाई सांगुनी तुझी कहाणी, वादळ उठता मनात भीषण
गुपित सांगते राधे तुजला
तुझ्याविना ना चैन हरीला
याच घडीला तव भेटीला, अधीर झाला असेल साजण
राधिके येईल ग मोहन
हा नवरंगी साज सुगंधी
करिते गोकुळ बघ आनंदी
भिजवाया या हर्षाला उगाच का वर्षावा सावन
लोचन डोही यमुनेवाणी
जमले काळे काजळपाणी
जाई सांगुनी तुझी कहाणी, वादळ उठता मनात भीषण
गुपित सांगते राधे तुजला
तुझ्याविना ना चैन हरीला
याच घडीला तव भेटीला, अधीर झाला असेल साजण
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | मंदार आपटे |
स्वर | - | साधना सरगम |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |