A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्मरशिल राधा स्मरशिल

स्मरशिल यमुना स्मरशिल राधा
स्मरशिल गोकुळ सारे
स्मरेल का पण कुरूप गवळण
तुज ही बन्सिधरा रे

रास रंगता नदीकिनारी
उभी राहिले मी अंधारी
नकळत तुजला तव अधरावर
झाले मी मुरली रे

ऐन दुपारी जमीन जळता
तू डोहावर शिणून येता
कालिंदीच्या जळात मिळुनी
धुतले पाय तुझे रे
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.