A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोडुन वैभवमंदिर अपुले

सोडुन वैभवमंदिर अपुले, सोडुन द्वारापुरी
दळितसे देव जनीच्या घरी

श्यामल कोमल कांती सुंदर
तांबुस शोभे जरी - पीतांबर
तन्मय होऊन हरी गातसे ओवी जात्यावरी

गहिवरलेले डोळे मिटुनी
श्रीकृष्णाची मूर्ति स्मरोनी
नाम तयाचे ओवीतुन ती गुंफे सुमनापरी

दाणे सरतां नयन उघडिले
कृष्ण-सावळें तिने पाहिले
भावफुलांचे आंसू पडती श्रीहरिचरणांवरी