A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोऽहम हर डमरू बाजे

'सोऽहम' हर डमरू बाजे

उसके सुर तालों के
सुखकारक झूले पर
झूम रहे सरिता-सर
भुवन-त्रय गाजे

डमरु-ओंकार नाद
परमेसर का प्रसाद
उसके ही महिमा से
गिरि-कंदर गाजे
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वराविष्कार- ज्योत्‍स्‍ना मोहिले
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मंदारमाला
राग - तोडी
ताल-एकताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गिरिकंदर - डोंगरातली गुहा.
सोहं - मीच ब्रह्म असा भाव.
ज्या देशांतील भगवंत, निष्काम कर्मयोगाचा संदेश देणारा पूर्णावतार आधीं गोकुळ वृंदावनांतील बन्सी बजैय्या आहे; जेथील सर्व विद्यादायिनी देवता 'वीणावर-दंड-मंडितकरा' अशी कला विलासिनी आहे; जेथील वैराग्यशील महर्षीदेखील ब्रह्मवीणेच्या नादब्रह्मांत तल्लीन होणारे संगीतशास्‍त्रज्ञ आहेत, त्या देशाची महान् संगीत परंपरा काय वर्णावी ? ह्या परंपरेत संगीताला ' पंचम वेदा'ची पदवी प्राप्त करून देणारे थोर थोर गायक नि नायक होऊन गेले. त्यांच्यापैकी दोन-तीन गायकांच्या जीवनांतील कांही प्रसंगाचे आधार घेऊन, मी हें स्वतंत्र नाटक लिहिले आहे. अर्थात् ह्यांत कांहीं गवयांच्या जीवनांतील प्रसंग आणि स्वभाववैशिष्टयें यांच्या छटा कोठें कोठें आढळल्या, तरी ह्याचें कथानक पूर्णतः काल्पनिक आहे.
(संपादित)

विद्याधर गोखले
'मंदारमाला' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद-सरस्वती प्रकाशन, मुंबई

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

  ज्योत्‍स्‍ना मोहिले
  आशा खाडिलकर