A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोळावं वरीस धोक्याचं

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
अन्‌ सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं

पिसाट वारा मदनाचा
पतंग उडवी पदराचा
तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं

रात रुपेरी फुलली ग
मला पौर्णिमा भुलली ग
अंगावरती सांडू लागलं टिपूर चांदणं रूप्याचं

ओढ लागली संगतीची
नजरभेटीच्या गमतीची
आज मला हे गुपीत कळलं जत्रेमधल्या धक्क्याचं
रूप्य - चांदी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.