गुंफु चला सुममाला
मानवतेची मंगलमूर्ती
तेजाचा ध्वज घेउनि हाती
आली उषा उदयाला
पुढे चला ध्वज झेला
उमलल्या कळ्या सुरम्य बाला
गाति मुखे 'वंदे मातरम्' !
सोन्यात नाहुनिया
करू विहार या सुंदर नौकात !
ही परि धुळीत फुलली फुले,
नयनी हाय आशा ना खेळे !
तळमळती मनी, कोणी न उचली !
गोड बोल ते कुणी ना बोले !
हळुच उषा कुरवाळी गाली
हसा सख्यांनो हसतो हा नंदनवन मेळा
| गीत | - | वि. स. खांडेकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, पं. हृदयनाथ मंगेशकर |
| चित्रपट | - | माझं बाळ |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
| उषा | - | पहाट. |
| सुम | - | फूल. |
१. वि. स. खांडेकर यांनी रचलेले हे गीत, त्या काळी देखील चाल आधी व शब्द नंतर असे प्रकार होत असत, याची साक्ष पटविणारे आहेत. दत्ता डावजेकर कित्येक वेळा खांडेकरांच्या समोर पेटी घेऊन चाल वाजवून व गुणगुणून दाखवीत. मग त्या जागा खांडेकर योग्य शब्दांनी भरून काढीत. अर्थात् ही पद्धत काव्याला बहुधा मारकच ठरते याचा प्रत्यय गीताचे शब्द वाचून येईलच. पण आश्चर्य म्हणजे अजूनही चित्रपटक्षेत्रात ही पद्धत रूढ आहे.
२. मंगेशकर भावंडे त्या काळी लहान होती. सर्व पाचही मंगेशकर भावंडांनी एकत्र येऊन गायलेले हे गीत म्हणून विशेष लक्षणीय !
(संपादित)
सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख