सोनुल्या गुपित सांगते
सोनुल्या गुपित सांगते तुला
तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला
जणू बिलोरी हसरी कमळे
तुझे टपोरे सुंदर डोळे
आभाळाच्या पलिकडचेही त्यातुन दिसते मला
तुझे गुलामा घेता चुंबन
होते मजवर अमृतसिंचन
या सौख्याचा हेवा करुनी चंद्र झुरू लागला
अज्ञातातुन उदया आला
घरात माझ्या किरण कोवळा
झुळझुळत्या या आनंदाहून देव काय वेगळा
तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला
जणू बिलोरी हसरी कमळे
तुझे टपोरे सुंदर डोळे
आभाळाच्या पलिकडचेही त्यातुन दिसते मला
तुझे गुलामा घेता चुंबन
होते मजवर अमृतसिंचन
या सौख्याचा हेवा करुनी चंद्र झुरू लागला
अज्ञातातुन उदया आला
घरात माझ्या किरण कोवळा
झुळझुळत्या या आनंदाहून देव काय वेगळा
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | माणिक वर्मा |
चित्रपट | - | शेवग्याच्या शेंगा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
बिलोरी | - | काचेचे. |
सिंचन | - | शिंपणे. |