A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोयरा सुखाचा विसांवा

सोयरा सुखाचा विसांवा भक्तांचा ।
विठोबा निजाचा मायबाप ॥१॥

कृपाळु दीनांचा पडिभर नामाचा ।
तोडर ब्रीदाचा साच तया ॥२॥

काया-मनें-वाचा संग करा त्याचा ।
अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥

नामा ह्मणे आह्मां दीनांचे माहेर ।
हरी निरंतर ना विसंबे ॥४॥
तोडर - पायात घालायचे तोडे.
पडिभर - सोबती / अधिकपण.
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.