स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी!
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसि जगावर
दशा तुझी ही केविलवाणी!
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणांत ठरली तूच पापिणी!
हृदयी अमृत नयनी पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी!
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसि जगावर
दशा तुझी ही केविलवाणी!
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणांत ठरली तूच पापिणी!
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | बाळा जो जो रे |
गीत प्रकार | - | चित्रगीत , नयनांच्या कोंदणी |