A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुकांत चंद्रानना पातली

सुकांत चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनी ॥

कटाक्ष खरशर सोडुनि भेदित हृदयचि गजगामिनी ॥

रदन दिसति जणुं शशिबिंबाचे खंड मुखीं खोविले ॥

कुरळ केश शिरिं सरळ नासिका नेत्र कमलिनीदलें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- अजितकुमार कडकडे
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संशयकल्लोळ
राग - भूप, यमन
चाल-लावणीची चाल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
खर - कठिण (संस्कृत) / गाढव (मराठी).
भृकुटी (भ्रू) - भिवई.
रदन - दात.
शर - बाण.
शशी - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अजितकुमार कडकडे
  प्रभाकर कारेकर