A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुख येता माझ्या दारी

सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल
दिन सोन्याचा संसारी

सुवासिनीच्या देहतरूवर
हर्ष-फुलांचा फुलता मोहर
गंधवती मी होऊन जाइन
सुखदेवाला सामोरी

नेत्रशिंपली भरता स्वाती
आनंदाचे झरता मोती
पति प्रेमावर उधळित राहिन
मनोमनीच्या देव्हारी

अमर सुखाची पडता दृष्टी
उजळून जाता जीवनसृष्टी
उणे न काही सुखरूप मीही
सर्व सुखाच्या मंदिरी
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - बायकोचा भाऊ
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.