A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखचि सदा कधीं मिळत

सुखचि सदा कधीं मिळत न कवणा । मिश्ररूप जग ।
सुखचि रिघे अघ । दु:खातुनि हो जन्म सुखांना ॥

हो जरि आशा मात्र सुखवशा । करित विधि तरी अंतिं निराशा ।
रमत मतिहि नच प्राप्त सुखिंहि मग । करि अवमाना ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर-
नाटक - एकच प्याला
राग - छायानट
ताल-त्रिवट
चाल-नाचत धी धी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
अघ - पाप.
मति - बुद्धी / विचार.
रिघणे - शिरणे / प्रवेशणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.