A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखद या सौख्याहुनी वनवास

सुखद या सौख्याहुनी वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥

गोदातटीची पंचवटी ती, आठवते मज पर्णकुटी ती
प्रिय रघुनंदन, प्रिया जानकी, एकामेकां जवळ सारखी
कपोत युगुलापरी लाभला रात्रंदिन सहवास ॥

येथ घेरिती तया प्रजाजन
दुरावती मज जानकी-जीवन
भरजरी वसने, रत्‍नकंकणे, असह्य मज ही राजभूषणे
रावणसे हे राज्ञीपद का कारण हो विरहास ॥
कुटिर (कुटी) - झोपडी.
राज्ञी - राणी.
वसन - वस्‍त्र.

 

Print option will come back soon