सुकुनी गेला बाग
सुकुनी गेला बाग
आठवणींच्या मुक्या पाकळ्या पडल्या जागोजाग
आज फुलांतुन सुगंध उडले
पाचोळ्यातच पाऊल बुडले
जुन्या हरवल्या पाऊलवाटा, कसा काढणे माग?
त्या तरूखाली एकामेकां
दिल्याघेतल्या आणाभाका
पानांसंगे आशा जाळीत ये ग्रीष्माची आग
पालवीतली विटली नक्षी
झाडांवरती मुकेच पक्षी
गीत गळ्यातच गुदमरले त्या पुन्हा न येई जाग
आठवणींच्या मुक्या पाकळ्या पडल्या जागोजाग
आज फुलांतुन सुगंध उडले
पाचोळ्यातच पाऊल बुडले
जुन्या हरवल्या पाऊलवाटा, कसा काढणे माग?
त्या तरूखाली एकामेकां
दिल्याघेतल्या आणाभाका
पानांसंगे आशा जाळीत ये ग्रीष्माची आग
पालवीतली विटली नक्षी
झाडांवरती मुकेच पक्षी
गीत गळ्यातच गुदमरले त्या पुन्हा न येई जाग
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | भाग्यलक्ष्मी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आणाभाका | - | शपथा, वचन. |
पाचोळा | - | वाळून खाली पडलेली झाडांची पाने. |