सूर माझा मायबाप
सूर माझा मायबाप, सूर माझा देव हो
गळ्यामधी जपली मी लाखाची ही ठेव हो
कलावंत झाला गोळा, नातं माझं जुळलं
फडांचं हे झाड माझं भरारून फुललं
लोकरंजनाचा असा मांडिला डाव हो
कोकिळेनं दिलं मला सूरांचं हे दान
सपनात शिकले मी गर्धवांचं गाणं
जिद्द माजी भोळी खुळी, भोळा खुळा भाव हो
दुष्ट लागली ग बाई माझ्या या सुखाला
निंदेचं का रूप आलं माझ्या कौतुकाला
आनंदला आग लागे, बसला की घाव हो
गळ्यामधी जपली मी लाखाची ही ठेव हो
कलावंत झाला गोळा, नातं माझं जुळलं
फडांचं हे झाड माझं भरारून फुललं
लोकरंजनाचा असा मांडिला डाव हो
कोकिळेनं दिलं मला सूरांचं हे दान
सपनात शिकले मी गर्धवांचं गाणं
जिद्द माजी भोळी खुळी, भोळा खुळा भाव हो
दुष्ट लागली ग बाई माझ्या या सुखाला
निंदेचं का रूप आलं माझ्या कौतुकाला
आनंदला आग लागे, बसला की घाव हो
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | विश्वनाथ मोरे |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | रानपाखरं |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले