सूर्यदेव आला
आभाळानं उघडला सोनियाचा डोळा
निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला
कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग
गोठ्यामधे बोलाविते गाय वासराला
झाली तुळशीची पूजा, गाव लागे कामकाजा
दुरिताला पुण्याईचा मिळाला उजाळा
निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला
कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग
गोठ्यामधे बोलाविते गाय वासराला
झाली तुळशीची पूजा, गाव लागे कामकाजा
दुरिताला पुण्याईचा मिळाला उजाळा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | काळी बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
दुरित | - | पाप. |