A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वप्‍न उद्याचे आज

स्वप्‍न उद्याचे आज पडते
चित्र चिमणे गोजिरवाणे, नयनापुढती दुडदुडते!

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे शिवराजे, शिवनेरीवर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते!

चितोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाल होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी, अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते!

ऊठ म्हणता उठते क्रांती, ज्याच्या मागून फिरते शांती
जवाहिराची राजस मूर्ती, लाडेलाडे 'आई' म्हणता
भारत-दर्शन मज घडते!
कटि - कंबर.
जिरेटोप - शिरस्‍त्राण.
वत्सल - प्रेमळ.
सान - लहान.