स्वप्नांतरी जे भेटून गेले
स्वप्नांतरी जे भेटून गेले जागेपणी ते येईल का?
मौनातुन जे संतत झुलते ते आकारा घेईल का?
नीजही नाही जागही नाही
तरीही न भासे अधांतरी
मन जणू झाले निळे पाखरू, मलाही संगे नेईल का?
अवचित येथे अवचित तेथे
नकळत जादू कशी घडे
क्षण सारे जरी जातील उडुनी, क्षण हा मागे राहिल का?
मौनातुन जे संतत झुलते ते आकारा घेईल का?
नीजही नाही जागही नाही
तरीही न भासे अधांतरी
मन जणू झाले निळे पाखरू, मलाही संगे नेईल का?
अवचित येथे अवचित तेथे
नकळत जादू कशी घडे
क्षण सारे जरी जातील उडुनी, क्षण हा मागे राहिल का?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत |