A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वर्गाहुनही प्रिय आम्हाला

स्वर्गाहुनही प्रिय आम्हाला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक जरीही नाना जाती नाना वेष

या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष

श्रीरामाचे शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी प्रताप बाजी थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश

हिमायलापरी शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हांला दे आदेश
संगर - युद्ध.