A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वातंत्र्याची घुमे तुतारी

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणांतून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठीमुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्यापिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती

 

Print option will come back soon