टाळ बोले चिपळीला
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होउनी निःसंग
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग
ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होउनी निःसंग
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग
ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | भोळी भाबडी |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
टीप - • सहस्वर- विष्णू वाघमारे, जी. मल्लेश. |
रंक | - | भिकारी / गरीब. |