तार छेडिता बोल उमंगे
तार छेडिता बोल उमंगे
विठ्ठल रखुमाई पांडुरंगे
तुझ्यासारखा तूच खरोखर
जगताचा जगदीश मनोहर
माय माउली रखुमाई तर
वामांगी तव सदैव संगे
भक्तीसाठी आतुरलेला
भक्तांचा तू देव आगळा
तुझ्या लोचनी जगावेगळा
भाव रंगतो अनंतरंगे
शब्दोशब्दी अमृत ओतुनी
संतांची ती रसाळ वाणी
भावभक्तीने तुझिया चरणी
गाथा पोथी अभंग सांगे
विठ्ठल रखुमाई पांडुरंगे
तुझ्यासारखा तूच खरोखर
जगताचा जगदीश मनोहर
माय माउली रखुमाई तर
वामांगी तव सदैव संगे
भक्तीसाठी आतुरलेला
भक्तांचा तू देव आगळा
तुझ्या लोचनी जगावेगळा
भाव रंगतो अनंतरंगे
शब्दोशब्दी अमृत ओतुनी
संतांची ती रसाळ वाणी
भावभक्तीने तुझिया चरणी
गाथा पोथी अभंग सांगे
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | स्नेहल जोशी |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल |
वामांगी | - | डाव्या (वाम) बाजूस बसणारी ती- पत्नी. |