A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
टक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ पदर

टक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ पदर
नार तोर्‍यात नखर्‍यात चालते
डाव्या डोळ्याची शीळ अशी घालते

रंगानं सावळा दिसायला देखणा
मनात भरला वळखीचा पावणा
हसतोय्‌ गालात करतोय्‌ खुणा
नजरेला नजर बाई ग तुझीमाझी जुळते

पदराचा पतंग व्हटात धरला
धुंदीचा वारा अंगात शिरला
मनाचा भवरा गरगर फिरला
मदनाच्या मिठीत ही ग कमळण डुलते
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले