A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तेचि पुरुष दैवाचे

तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥

अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- प्रभाकर कारेकर
नाटक - मृच्छकटिक
राग - मालकंस
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
स्वये - स्वत:
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
मृच्छकटिकम्

शूद्रकलिखित दहा अंकी संस्कृत प्रकरणनाट्य. या प्रकरणाचे कतृत्त्व विद्वानांनी शूद्रकाला दिले नाही परंतु सर्वसामान्यपणे तोच कर्ता समजला जातो.

शूद्रकाच्या व्यक्तीरेखेबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली किंवा उपलब्ध माहितीमध्ये विविधता अथवा मतभेद असले तरीही 'मृच्छकटिकम्‌'मधील प्रस्तावनेच्या श्लोकावरून असे म्हणता येते की शूद्रक हा एक राजा आणि प्रख्यात कवी असावा.

या प्रकरणाची बीजे आपल्याल्या गुणाढ्याच्या बृहत्कथेमध्ये बघायला मिळतात. त्याचप्रमाणे हे प्रकरण भासाच्या दरिद्र-चारुदत्त या नाटकावर आधारित आहे, असेही मानले जाते. या प्रकरणातील अवतरणांच्या उल्लेखांवरून या प्रकरणाचा काळ इसवी सन् तिसरे ते सातवे शतकामधील असावा, असे मत विद्वान मानतात.

'मृच्छकटिकम्' हे या प्रकरण नाट्याचे नाव, हे या प्रकरणातील एका घटनेशी जोडलेले नाव आहे. 'मृच्छकटिकम्' म्हणजे मातीची गाडी. ही गाडी जणु पात्ररूपाने येथे दिसते आणि कथानकाच्या विकासाला हातभार लावते. चारुदत्त पुत्र रोहसेनाचा मातीची गाडी खेळण्यास दिलेला नकार, अतिदानामुळे चारुदत्ताला आलेल्या निर्धनत्वाचे सूचकत्व, वसंतसेनेने स्वतःच्या आभूषणांनी बनवलेला सुवर्ण शकट आणि त्यामुळे पुढे घडलेले सर्व प्रसंगनाट्य, या सर्व बाबींमुळे या प्रकरणाला 'मृच्छकटिकम्' हे नाव दिल्याचे लक्षात येते.
(संपादित)

प्रज्ञा देशपांडे
सौजन्य- मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org)
(Referenced page was accessed on 9 August 2023)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.