A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थांब रे पथिका जरा

थांब रे पथिका जरा जा ऐकुनी माझी कथा
नीट घे पाहोनिया नांवाजल्या प्रीतीपथा

दिसति तुज वाटेवरी या उमटली ही पाऊलें
चुरली किति पायातळी हृदयें तयानें चालतां

काजळांतुनि वाहिली गुपितेंच कीं गालावरी
पुसली न कोणी आसवें, कोणा न कळली रे व्यथा
गीत- राजा बढे
संगीत -
स्वर - श्यामा चित्तार
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १५ ऑगस्‍ट १९५१