A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थंड ही हवा धुंद गारवा

थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस रिमझिम बरसे!

रेशिमधारा या रुणझुणती
जलथेंबांचे उधळित मोती
पानफुले नाचती, गंधफुले भोवती
झुलती जलांचे आरसे!

काजळकाळ्या या आकाशी
वीज रेखिते सुंदर नक्षी
वारा खुळा होउनी, नाचे कसा अंगणी
गाणे खुषीचे गातसे!

हिरवी शेते हिरवी राने
फुलली भवती हिरवी कवने
नटली बघा ही धरा, झोक तिचा साजिरा
नवरी नवेली ही दिसे!